दि. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नवीनच तयार झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकारवार समस्त पाचोरा वासियांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय ज्योती जय क्रांतीचा जय घोष करत प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून प्रलंबित असलेल्या स्मारकाचा विषय आमदार किशोर पाटील यांच्या फंडातून मार्गी लावल्यामुळे आमदार पाटील यांचे देखील येथील विशेष आभार समस्त माळी समाज व बहुजन समाजाच्या वतीने शब्द सुमनाने करण्यात आले. या वस्तू उभारणीचे काम माळी समाजातील बांधकाम ठेकेदार मयूर महाजन व सुनील महाजन यांनी कमीत कमी वेळेत अनेक अडचणीवर मात करून फुले स्मारक पूर्ण केले यांचे देखील सर्वांचा वतीने आभार मानण्यात आले आहे. याठिकाणी पाचोरा येथील प्रांताधिकारी विक्रम बांदल त्याच बरोबर पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ तसेच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,कृष्णापुरीचे नगरसेवक विकास पाटील,नगरसेवक मोरे साहेब,सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले,प्रवीण ब्राम्हणे,किशोर बारवकर या सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती. माळी समाज पंच मंडळ आयोजित या कार्यक्रमात पाचोरा शहरातील माळी समाजाचे प्रमुख नेते पदाधिकारी,माळी समाजाचे माजी नगरसेवक,पंच मंडळाचे माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते आवर्जून याठिकाणी उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रतिमा पूजन व स्मारकाला भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
भरधाव अनियंत्रित ट्रॅक्टर नागरी वस्तीत; अकरा वर्षीय बालिका जागीच ठार; आमडदे येथील पहाटेचा थरार