पाचोरा(वार्ताहर) दि,१२
पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्यामुळे इतर राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महाविकास आघाडी पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व माजी आमदार वाघ या नेत्यांची बैठक झाली. त्यामुळे एकत्रितपणे १८ जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, गणेश परदेशी, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, सुदर्शन पाटील, अजय अहिरे आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने आमदार किशोर पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. त्या बदल्यात आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल न केल्याने दिलीप वाघ हे बिनविरोध निवडून आले होते. यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ व भाजपच्या काही जुन्या लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पाचोरा येथील फुले स्मारकावर महात्मा फुले जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न!