श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त / परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथी निमित्त 1 मे रोजी तालुकास्तरीय महारक्तदान शिबिर पाचोरा दत्त कॉलनी श्री स्वामी समर्थ केंद्रात संपन्न झाले.
एक हात मदतीचा(नमन करणाऱ्या दोन हातापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो)या गुरु माऊलीच्या संदेशा प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,रुग्णालय , रक्तपेढी जळगाव यांच्या 9 डॉक्टरच्या टीमच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. 37 सेवेकरी यांनी रक्तदान यावेळी केले.
शासनातर्फे प्रमाणपत्र व शिल्ड गुरुकुल पिठ शाखा..दत्त कॉलनी सेवा केंद्र यांना यावेळी देण्यात आली.. अतिशय स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे तोंड भरून कौतुक डॉक्टर , त्यांच्या टीमने, व अनेक सेवेकरी यांनी यावेळी केले.रक्तदात्यांना शासनाचे प्रमाणपत्र व डोनर कार्ड यावेळी देण्यात आले.. या कार्डवर रक्तदात्यांना/नातेवाईकांना येत्या दोन वर्षात एक रक्ताची बॅग विनामूल्य संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही ऍडमिट असल्यावर मिळू शकणार आहे.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले.. आलेल्या सर्व डॉक्टर टीमचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
केंद्राच्या परिसरातील रांगोळ्या, महिलां सेवेकरी यांचा सक्रिय सहभाग , तरुण सेवेकरी, बालगोपालांचा उत्साह.. पाहून संपूर्ण डॉक्टरांची टीम भारावली होती.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी ,सौ.रेखाताई पाटील,श्री. मनिष बाविस्कर सर, श्री.सुवर्णसिंग राजपूत सर श्री गजेंद्र चौधरी सर , श्री. अंबालाल पवार सर, श्री.सुधीर महाजन सर,राहुल बाऊचेसर, संकेत बोरसे सर,श्री. जुगल राठोड सर,श्री. गिरीष दुसाने, शंभू पाटील, प्रफुल्ल राजपूत, श्री.अतुल पाटील, श्री किरण वाणी, श्री मनोहर भाऊ परदेशी,अमित वाणी, मयूर सोनवणे,अभिषेक नेरकर,संकेत ठाकूर, हर्षल चित्ते, ललित चित्ते, दिग्विजय पाटील, सौ. ज्योतीताई पाटील सौ.कल्पनाताई परदेशी, सौ. वैशालीताई महाजन, सौ. संगीताताई, सौ.सुनंदा वारुळे , सौ. वंदना चित्ते, सुरेखाताई पाटील ,जयश्री पाटील, पल्लवी ताई पाटील, प्रतिभाताई पाटील, शोभाताई ,भाविकाताई पाटील नंदिनीताई पाटील यांनी परिश्रम घेतले.
श्री मंगेश पाटील सर, ,श्री.प्रा. डी.पी. वाणी,श्री शरद बापू(भातखंडे),श्री. गायकवाड आप्पा, बी.जे. पाटील,श्री. डॉ. विजय ढवळे,श्री. विकास पाटील(कडे वडगाव) , श्री. अभिजीत पाटील सर (पिंपळगाव हरेश्वर) , श्री. विश्वजीत पाटील सर, बबलू वाणी(शिंदाड) ,श्री सोपान भाऊ धनगर(बिल्दी) लोहार भाऊ (कुऱ्हाड) संजय गोसावी (साजगाव), श्री. गोरख भाऊ (ओझर) यांची उपस्थिती होती.
पिक नुकसानीची पूर्वसूचना ७२ तासांच्या आत विमा कंपनीस देण्याचे आवाहन