पाचोरा ( प्रतिनिधी ) कुरंगी येथील शेत शिवारातील बिबट्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गाईचा फडशा पाडला असून शेतात काम करणाऱ्या मजूर तरुणावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले तरुणाने आरडा ओरड केल्याने जीव वाचला दिनांक २६ रोजी सकाळी युवराज राजधर पाटील कुरंगी ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गट नंबर ३८४/२ या शेतात दोन गाई दोन बैल असे झाडाखाली बांधलेले असताना बिबट्याने गाईचा फरशा पाळत असताना शेतकरी युवराज पाटील शेतात जाताच बिबट्याने तिथून पळ काढला शेजारील आप्पा तापीराम पाटील यांच्या लिंबूच्या शेतात घुसला असून तेथे शेतात काम करणारा राजेश बापू लोहार वय (२६) त्याच्या मित्रासोबत शेळीचा चारा काढत असताना बिबट्याने त्या तरुणावर जोरदार हल्ला चढवला त्या हल्ल्यात राजेश लोहार याच्या चेहऱ्यावर पंजा मारून त्याचे दोघी हातांना चावा घेतला सोबत काम करणारे मित्र असल्याने त्यांनी जोरात आरडा ओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला या जीव घेणे हल्ल्यात राजेश जबर जखमी झाला असून त्याला उपसरपंच शालिग्राम पाटील, सदस्य अविनाश कोळी, तंटामुक्ती चे अध्यक्ष नामदेव पाटील, अजय जयस्वाल यांनी जखमी अवस्थेत नांद्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .कुरंगी येथील सरपंच सीमा पाटील यांनी पाचोरा वनविभागाशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल पी.बी.देवरे वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी वाहन चालक सचिन कुमावत यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णात जाऊन जखमी मजुराची विचारपूस करून घटनेची संपूर्ण माहिती जाणुन घेतली पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे पथक सोनटेक शिवारात पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, अविनाश कोळी, सागर मोरे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.
बामसेफचे लोणावळ्यात शनिवार पासून राज्य अधिवेशन