पाचोरा(वार्ताहर) दि,१२
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वात मजल दरमजल विकासाचे टप्पे गाठणाऱ्या पाचोरा नगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या मागणीची दखल घेत शहरात सुसज्ज सर्व सुविधायुक्त भव्य व्यापारी संकुल साकारले जाणार । असुन माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या नावे उभारल्या जाणाऱ्या या व्यापारी भवनाचा भूमीपूजन सोहळा सोमवार दि १३ रोजी संध्याकाळी ५ वाजता आ.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
भडगाव रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पालिकेच्या जागेवर शासनाच्या वैशिट्यपूर्ण निधीतून सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या या व्यापारी भवनाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने निवडणुकीच्या जाहीर प्रचारातुन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आ.किशोर अप्पा पाटील यांचे कडून होणार असल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,गंगाराम पाटील, शीतल सोमवंशी, सतीश चेडे,बापु हटकर, राम केसवणी,तालुका प्रमुख सुनील पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी,युवासेना शहर प्रमुख संदीप राजे पाटील,यांचेसह शहरातील सर्व व्यापारी बांधवांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाला शहरातील सर्व व्यापारी बांधवांसह शिवसेना युवासेना महिला आघाडी व्यापारी आघाडी सह अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व शिवससैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन पाचोरा पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार
अमळनेर शहरात संचारबंदी लागू