पाचोरा ता.पाचोरा- भडगाव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्षपदी डॉ. जयंत पाटील पांची तर सचिवपदी डॉ. स्वप्नील पाटील यांची बिनविरोध निवड झाली.. आयएमए पदाधिकारी सदस्यांची बैठक नुकतीच आशीर्वाद हॉल येथे झाली. डॉ. मनोज पाटील अध्यक्ष स्थानी होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन नूतन कार्यकारिणी एकमताने गठीत करून जाहीर करण्यात आली. या प्रसंगी डॉ. जयंत पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पाचोरा वडगाव तालुक्यातील डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.पदाधिकारी असे अध्यक्ष डॉ. जयंत पाटील, सचीव डॉ. स्वप्नील पाटील खजिनदार डॉ. अनूप अग्रवाल, डॉ. शशिकांत खानोरे, डॉ. सुनील पाटील डॉ. अनिल झा, डॉ. सुरेश बाहेती उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथमच मिळाले स्वस्त धान्य दुकानास आयएसओ नामांकन