पाचोरा येथील भडगाव रोड परिसरातील जुनी वस्ती असलेली संघवी कॉलनी, मानसिंगा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, गाडगेबाबा नगर, पोलिस वसाहत मागील परिसर, यशोदा नगर या ठिकानीं रस्त्यांची अवस्था खूपच बिकट आहे, काही ठिकाणी भुयारी गटारींच्या कामानंतर सम्पूर्ण रस्त्याचे दोन तुकडे झालेत, गाडी चालवनं व पायी चालन म्हणजे कसरतच. काही ठिकाणी रस्त्याच्या मदोमध खड्डे आहेत ,यामुळे येथे सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात. आज पाचोरा शहराच्या सर्व नवीन वसाहतीत सुद्धा रस्ते झालेत ,फक्त हाच परिसर दुर्लक्षित कसा असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. सदर रस्त्यांच्या कामांसाठी व राहिलेल्या ओपन स्पेस सुशोभीकरण करने या कामांसाठी जितेंद्र जैन यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व याकामी आमदार किशोर अप्पा पाटील यांची भेट घेतली. प्रत्येकाने यावेळी आमदारांकडे व्यथा मांडतांना मन मोकळं केले. यावेळी पुढील दीड महिन्यात सर्व रस्त्यांची काम सुरू होतील असे ठोस आश्वासन आमदारांनी सगळ्यांना दिले. रस्ते पूर्ण होई पर्यंत याचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे जितेंद्र जैन यांनी सांगितले. यावेळी भरत शेंडे,विशाल राजपूत, कमलेश सुराणा, महेंद्र पाटील, फईम शेख, सुनील पाटील, आदेश संघवी, सचिन संघवी, यश संघवी, रोशन पारख, चेतन पवार समवेत प्रभागातील 40 ते 50 नागरिक उपस्थित होते .
हे पण वाचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते रविवारी चाळीसगाव स्टेशनचा “अमृत भारत स्टेशन” योजनेत होणार शुभारंभ
निसर्गकवी ना.धो. महानोर यांचे निधन
डोळे येणाची साथ- लक्षणे, निदान , समज व गैरसमज