पाचोरा (प्रतिनिधी) भारताचा स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमीत्त “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेले आहे. त्या निमीत्ताने दिनांक 11/08/2023 रोजी सकाळी 10-30 वाजता शालेय विद्यार्थ्यांची वृक्ष दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवर आयोजीत करण्यात आलेली होती. रॅलीमध्ये बुरहानी इग्लीश मेडीयम स्कूल व सु.भा.पाटील शाळा यांचा समावेश होता. रॅलीमध्ये मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वृक्षसंगोपन, झाडे लावा, भारत माता कि जय घोषणा देत रॅली हुतात्मा स्मारक येथे आणून विद्यार्थ्यांकडून पंच प्रण शपथ घेण्यात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर शासनाच्या महत्वकांक्षी अशा वसुधा वंदन उपक्रमाअंतर्गत शहरातील अष्टविनायक नगर येथील खुल्या जागेत 75 देशी जातीच्या वृक्षांची अमृत वाटिका तयार करण्यात आली. यावेळी शहरातील विविध मान्यवर अधिकारी / कर्मचारी यांचेकडून वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्येंत होणाऱ्या शासनाच्या सर्व उपक्रमांना मोठया प्रमाणात उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन या वेळी उपस्थितांना दिले वरील दोन्ही कार्यक्रमांना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर निरीक्षक दगडू मराठे, संजय बाणाईते, मधुकर सुर्यवंशी, ईश्वर सोनवणे, जितेंद्र मोरे, नितीन लोखंडे, मंगेश माने, सुधीर पाटील, ललित सोनार, प्रकाश गोसावी, भारती निकुंभ, प्रगती खडसे, प्रकाश पवार, विलास देवकर, शाम ढवळे, बुरहानी शाळेचे बी.एन.पाटीलसर, सु.भा.पाटील शाळेचे परदेशी सर, विशाल दिक्षीत, विलास कुंभार, किशोर मराठे, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, संदिप खैरनार,आकाश खेडकर, गजानन पाटील, नरेश आदिवाल, विठ्ठल पाटील, सुरेखा पाटील, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, रुमा खेडकर आदि उपस्थित होते. सुत्रसंचालक ललित सोनार यांनी केले तर आभार दगडू मराठे साहेब यांनी मानले.