जळगाव (प्रतिनिधी)- दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व वह्या वाटपचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शहराध्यक्ष (शिंदे गट) समाजसेवक श्री. श्यामभाऊ कोगटा, नगरसेवक श्री. मनोज चौधरी तर व्यासपीठावर संस्था सचिव श्री. अशोककुमार खिवसरा, शालेय समिती सदस्या सौ. साधना शर्मा, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री संजय पाटील, स्व. शेठ बी.एम. जैन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भास्कर फुलपगार उपस्थित होते. प्रारंभी माता सरस्वती व संस्था आद्य संस्थापक स्व. शेठ बी. एम. जैन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर डॉ. भवरलाल जैन अॅण्ड कांताई फाऊंडेशन जळगाव व स्व. अँड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने समाजसेवक श्री. श्यामभाऊ कोगटा याच्याकडून मिळालेल्या वह्यांचे तसेच संस्थेकडून मिळालेले गणवेश मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील यांनी आपल्या मनोगतातून दात्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्री. मुकुंद वाणी यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रानकवी महानोरांची शेतीनिष्ठा, निसर्गकविता प्रेरणादायी – कवी मनोहर आंधळे
आमडदे येथील पंचवीस वर्षापासून रखडलेले गटारीचे काम अखेर सुरू