शेतकऱ्यांना पीक पेरणी बाबत माहिती भ्रमणध्वनीवरील ॲप द्वारा उपलब्ध करून देण्यासाठी ई पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे अद्ययावत एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिलेले आहे .क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पिकांची आकडेवारी संकलित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देय असणाऱ्या विविध योजनांच्या थेट लाभासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पीक कर्ज, पीक विमा योजना ,नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान, आधारभूत किंमत धान्य योजना इत्यादीची अंमलबजावणी सुलभ होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात स्वतः ई पीक पाहणी अँप द्वारा आपल्या पिकाची नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मुकेश हिवाळे, तहसीलदार भडगाव यांनी केले आहे.
हे देखील वाचा…
जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये अनुकंपावर ‘यांना’ मिळाली नियुक्ती; मंत्र्यांनी वाटप केले नियुक्तीपत्र
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा २६ ऑगस्ट रोजी होणारा पाचोरा दौरा स्थगित- सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार
पाचोरा येथे अपघातांची मालिका सुरूच- गतिरोधका अभावी राजू शेलार यांचा दुर्दैवी मृत्यू
राज्यातील 50 हजार गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण