जळगाव – तायक्वांदो(Taekwondo) असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या राज्य संघटनेकडून आयोजित 33 वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. विविध वजनी गटात पुण्याच्या साक्षी पाटील, मृणाल वैद्य, निशिता कोतवाल, श्रुतिका टकले, भारती मोरे, नम्रता तायडे व ठाण्याच्या वंशिका रानोट व अनामिका डेका या सुवर्णपदक विजेत्या ठरल्या. राज्यभरातील सुमारे 300 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव राष्ट्रीय संघटनेस इंडियन ऑलिंपिक असोसिएशन व केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली असून, महाराष्ट्रामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या अधिकृत राज्य संघटनेतर्फे जळगावमध्ये राज्य स्पर्धा घेतली जात आहे. स्पर्धेतील विजेते खेळाडू आसाम येथे होणार्या राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी आणि केरळमधील खेलो इंडिया वूमेन्स लीगसाठी निवडले जाणार असल्याने या राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात 34 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (22 ऑगस्ट) युवा उद्योजक सागर चौबे, सौरभ चौबे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा तांत्रिक समितीचे प्रमुख प्रवीण बोरसे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव तथा राज्य संघटनेचे सदस्य अजित घारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
पुरुषांच्या आठ व महिलांच्या आठ वजन गटांमध्ये या स्पर्धा जागतिक संघटनेच्या नवीन नियमानुसार सेन्सरवर पार पडत आहेत. क्योरोगी व पुंमसे या दोन्ही प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडतील. फ्री स्टाइल पुंमसेचाही समावेश करण्यात आला आहे. जागतिक संघटनेच्या नवीन नियमासह राष्ट्रीय पंचांच्या मदतीने स्पर्धा पार पडतील. सर्व वजन गटांतील सुवर्णपदक विजेते खेळाडू 9 ते 12 सप्टेंबरदरम्यान आसाममध्ये होणार्या राष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. शिवाय, यावर्षी गोवा येथे होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र करणे, हे खेळाडूंची प्राथमिकता असेल. मंगळवारी पहिल्या दिवशी मुलींच्या गटातील स्पर्धेत पुणे जिल्हा संघाचे वर्चस्व राहिले. यातील सुवर्णपदक विजेत्या मुली आसाम येथे होणार्या राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, तर सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्या प्रत्येक वजन गटातील दोन खेळाडू केरळ येथे सप्टेंबरमध्ये होणार्या खेलो इंडिया वूमेन्स लीग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
मुलींच्या गटातील निकाल
46 किलो वजन गट ः सुवर्णपदक- साक्षी पाटील (पुणे), रौप्यपदक- स्वरूपा कोठावळे (औरंगाबाद), कांस्यपदक- श्वेता खिळे (मुंबई) व अमिना शेख (ठाणे). 49 किलो वजन गट ः सुवर्ण- मृणाल वैद्य (पुणे), रौप्य- वंशिका पटेल (मुंबई उपनगर), कांस्य- अशिता चाफळकर (अमरावती) व सायली गर्जे (सांगली). 53 किलो वजन गट ः सुवर्ण- निशिता कोतवाल (पुणे), रौप्य- नयन बारगजे (बीड), कांस्य- श्रुती चव्हाण (रत्नागिरी) व मेघना पाटील (ठाणे). 57 किलो वजन गट ः सुवर्ण- श्रुतिका टकले (पुणे), रौप्य- वसुंधरा चेडे (ठाणे), कांस्य- कोमल पवार (कोल्हापूर) व प्रियंका पल्हाड (औरंगाबाद). 62 किलो वजन गट ः सुवर्ण- भारती मोरे (पुणे), रौप्य- गायत्री बिनवडे (मुंबई उपनगर), कांस्य- विनायकी धडके (पालघर) व समृद्धी सांगळे (औरंगाबाद). 67 किलो वजन गट ः सुवर्ण- वंशिका रानोट (ठाणे), रौप्य- मनीषा गुटेकर (पुणे), कांस्य- प्रतीक्षा देवरे (अहमदनगर) व गौरी कुमावत (जळगाव). 73 किलो वजन गट ः सुवर्ण- अनामिका डेका (ठाणे), रौप्य- श्रेया पारडकर (औरंगाबाद), कांस्य- प्रणिता शिंदे (पुणे) व करिष्मा सिंग (पालघर). 73 किलोवरील वजन गट ः सुवर्ण- नम्रता तायडे (पुणे), रौप्य- महालक्ष्मी कांडेकर (पालघर), कांस्य- राधिका शर्मा (औरंगाबाद) व नामबी कोणार (ठाणे).
जळगावातील निरीक्षणगृहात गळफास घेतलेल्या मुलीचा मृत्यू
आ.किशोर अप्पा पाटील यांच्या तक्रारीनंतर ५७,९८३ शेतकऱ्यांना मिळाला २१५.२९ कोटींचा प्रोत्साहनपर रकमेचा लाभ
पालक-पाल्यांतील नैसर्गिक सुसंवाद हरवला आहे का या विषयावर पाचोऱ्यात शनिवारी गणेश शिंदे यांचे व्याख्यान