स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दहन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा
जळगाव शहरा लगत असलेले असोदा या गावी विजया दशमी, दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करताना काही माथेफिरू तरुणांनी रावण दहनाच्या प्रतिमेला स्वत्रांत्र सेनानी टिपू सुलतान यांचे छायाचित्राचे पोस्टर लावून त्याचे दहन केले व तशा आशयाचे छायाचित्र इंस्टाग्राम व त्यांच्या स्टेटस वर ठेवले.
स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या बाबत गैर कायदेशीर केलेल्या कारवाईचा जळगाव शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून त्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिस अधीक्षक एस राजकुमार व अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोपान कासार यांना प्रत्यक्ष भेटून एका तक्रार अर्जाद्वारे केलेली आहे.
पोलीस अधीक्षक तर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन पाटील यांनी तक्रार अर्ज स्वीकारले.
दोन्ही अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
शिष्ट मंडळात यांचा होता सहभाग
या शिष्टमंडळात कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मजहर पठाण, एम आय एम जिल्हा अध्यक्ष अहमद सर,
शिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अन्वर खान, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह, मानव समाचार चे प्रतिनिधी इमरान बिस्मिल्ला, बी. वाय. एफ.चे अध्यक्ष शिबान
फाइझ, दिव्याग संघटनेचे मूजाहिद खान,अँजेल फूड चे दानियल शेख यांची उपस्थिती होती
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी चार विशेष रेल्वे गाड्या