शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख पदी सुनील चौधरी यांची नियुक्ती
पाचोरा(वार्ताहर) दि,५
गेल्या सुमारे वर्ष भरा पासून रिक्त असलेल्या लोकसभा संपर्क प्रमुखाची नियुक्ती जाहीर झाली असून अंबरनाथ पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने कंबर कसल्याचे .या निमित्ताने समोर आले असून सुनिल चैधारी यांना लोकसभा क्षेत्रातील जळगाव शहर तसेच ग्रामीण,अमळनेर,एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा विधानसभा क्षेत्रात पक्षवाढीसह निवडणूकांमधील कामगिरी सुधारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या सहीचे त्यांना पत्र प्राप्त झाले असून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश त्यांना देण्यात आले असून आपण आगामी सर्वच निवडणुकांमध्ये आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत पक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन उभारी देण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पीबीसी मातृभूमीशी बोलतांना व्यक्त केली आहे. त्यांचे नियुक्तीवेळी शिवसेना पक्षाचे सह-सचिव एकनाथ शेलार,उप नेते आनंद जाधव आणी कार्यालयीन प्रमुख पांडुरंग पाटील यांची उपस्थिती होती.त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसू नये.