अॅग्रो आयडॉल अवार्ड 2023 पाचोऱ्यातील सुरेश पाटील यांना जाहीर,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! या तुकाराम महाराजांच्या ऊक्तीला खरे ठरवण्याचा खरा प्रयत्न केलेला आहे तर तो सुरेश पाटील यांनी, मिळालेल्या जमिनीचे सोने कसे करावे हे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे, तसेच भारतीय सैन्य दलात आपले संपूर्ण आयुष्य देशभक्तीसाठी खर्ची करत उर्वरित आयुष्य सैन्य दलाने दिलेल्या जमिनीवर आदर्श शेती सह उद्योग व्यवसाय वाढवत समाजकार्यासाठी झोकून घेतलेले समाजासमोर आदर्श ठरणारे हे सुरेश पाटील असे व्यक्तिमत्व, दरवर्षाप्रमाने यावर्षीही राष्ट्रीय स्तरावरील “अॅग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा 2023” आयोजित करण्यात येत आहे. कृषी विषयक व संलग्न कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, कृषी विस्तारक व कृषी संशोधन, कृषी व्यवसाय, कृषी क्षेत्रातील कार्य करणारे मान्यंवरांचा गौरव करण्याचा मानस गेल्या १५ वर्षापासून अॅग्रोकेअर कृषीमंचचा असतो. महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक, कृषी विचारवंत, संशोधक, कृषीवेत्ता हे शिक्षणासोबतच अनेक कृषी विस्ताराचे, संशोधनाचे कार्य करीत असतात, तसेच उद्याचा कृषीप्रधान देशाचे तरूण घडवत असतात. तसेच कृषी क्षेत्रात अनेक व्यक्ति नवनवीन व्यवसाय सुरू करून उत्तुंग भरारी घेतात,Also, in the field of agriculture, many individuals are making great strides by starting new businesses. या कार्याची दखल घेता अश्या मान्यवरांचा उचीत मान सन्मान व्हावा या उदात्त हेतुने कृषी संशोधन, कृषी विस्तार व कृषी व्यवसायमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे सर्वच मान्यवर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा व सन्मानाचा विशेष “अॅग्रोकेअर आयडॉल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, पाचोरा शहरालगतच 5km वर असलेल्या काकनबर्डी परिसरास निसर्गरम्य बनविण्यात मोलाचा वाटा उचलणारे व खडकाळ काकनबर्डीला नंदनवनचे स्वरूप देणारे पाचोरा तालुक्यातील मुळगाव तारखेडा येथील राहिवासी माजी रिटायर्ड आर्मी आधीकारी सुरेश भिला पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याने त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले असून, आता नुकतेच 15 वा नॅशनल लेव्हल अॅग्रो आयडॉल पुरस्कार 2023 त्यांना जाहीर करण्यात आलेला असून दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी नासिक येथे कृषी, उद्योग, राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रात उतुंग भरारी घेणाऱ्या नामांकितांच्या उपस्थितीत व नामांकितांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करत सुरेश पाटील यांना गौरविण्यात येणार असल्याने, पाचोरा तालुक्यासह जिल्ह्याभरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. • [अशा पुरस्काराने बळ मिळते, अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते, या पुरस्काराने सन्मानित होणे म्हणजे शिखर गाठने होय, अशी उंची गाठण्यासाठी माझे हित जोपासणाऱ्या माझ्या सर्व हितचिंतकांचे मी आभारी आहे
जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर