पाचोरा(वार्ताहर,) दि,६
विधानसभा २०१९ चा भाजपा पक्षाचा ऐन निवडणुकीतील दगा फटका झाल्याचा अनुभव गाठीशी व ताजा असतांना देखील यंदाच्या (Loksabha Election) लोकसभेच्या निवडणुकीत आमदार किशोर अप्पा पाटील, त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील तसेच त्यांचा चिरंजीव युवानेता सुमीत पाटील यांनी मात्र भाजपाच्या अर्थात महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराची राळ कायम राखाली असून अनेक मान्यवर नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मात्र याची “कुटुंब रंगलय प्रचारात” अशी संभावना करत त्यांच्या या सारथ्याचे कौतुक केले आहे,.
गत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचोऱ्याचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते आर ओ तात्या पाटील यांचे दुर्दवी निधन झाल्याने शिवसेनेवर मोठी शोककळा पसरली होती मात्र पक्षाच्या व मित्रपक्षांच्या व वरिष्ठांनी केलेल्या विनंतीला मान देत आ. किशोर अप्पा पाटील यांनी आपले दुःख बाजूला सारत “आधी लगीन कोंढाण्याचे” या उक्तीला जागत भाजपाचे तत्कालीन नवखे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा व भडगाव तालुका व शहर पिंजून काढत प्रचाराची राळ उठवली होती. त्यामुळे जळगाव लोकसभेतुन निवडून गेलेल्या भाजपा खासदार उन्मेष पाटील यांना लोकसभेत सर्वाधिक लीड पाचोरा मतदार संघातून मिळाला होता. मात्र त्याची बक्षीशी म्हणून की काय विधानसभेला मात्र भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या मतदार संघात बंडखोर उभे करून त्यांना चितपट करण्याचा डाव आखला होता. त्यात पाचोरा,जळगाव ग्रामीण,पारोळा,,चोपडा आदी मतदार संघांचा समावेश होता त्यामुळे आ.किशोर अप्पा पाटील यांना देखील निसटता विजय मिळाला होता. मात्र तरीदेखील वरिष्ठ पातळीवर झालेल्या महायुती प्रमाणे शिवसेनेने आपला युतीधर्म पाळत विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षावर नैतिक दबाव निर्माण केला आहे. आगामी निवडणुकीत काय होईल ? युती असेल की नसेल हे सर्व निर्णय अधांतरी असतांना देखील आपल्या संभाव्य स्पर्धक पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करणे याला देखील धैर्य लागत असल्याची भावना मात्र आम जनतेतुन व्यक्त होतांना दिसत आहे.
आ.किशोर अप्पा पाटील यांनी जाहीर सभा, कॉर्नर सभा,रॅली , मेळावे आदींचे नियोजन करून प्रचारात झोकून दिले आहे तर त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी तब्बेतीची कुरबुर बाजूला सारत स्मिता वाघ यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांमध्ये जाऊन प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तर त्यांचा मुलगा सुमीत पाटील याने देखील मतदार संघातील तरुणांची फळी स्मिता वाघ यांच्या पाठीशी उभी करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
अर्थात त्यांच्या या मेहनतीला जनता किती प्रतिसाद देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयाचा वारू उधळण्याची संधी देईल हे आगामी काळातच स्पष्ट होणार असले तरी सुद्धा ‘आमदारांचं अक्ख कुटुंब रंगलय प्रचारात’,अशी जनभावना सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे.
पाचोरा येथील जेष्ठ कवी पांडुरंग सुतार “कविवर्य कुसुमाग्रज” पुरस्काराने सन्मानित
पाचोरा डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कर्मचारी श्री शकील शेख यांना एक मे महाराष्ट्र दिन रोजी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रधान
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राजुरी बु. शाळेला पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक