पाचोरा- येथे २३ मार्च रोजी झालेल्या सभेत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ब्राम्हण समाजाबद्दल काढलेल्या अनुदगाराबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पाचोरा शाखेने तालुकाध्यक्ष मुकुंद बिल्दिकर यांचे नेतृत्वात तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध व्यक्त केला.
यावेळी नायब तहसीलदार संभाजी पाटील आणि पीएसआय विजया वसावे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की उद्धव ठाकरे यांनी त्यांचे भाषणात समस्त ब्राम्हण समाजाबद्दल “आम्हाला शेंडी जाणव्याचे राजकरण मान्य नाही” व “गाय ही बैलाला जन्म देते ती त्यांची माता आहे आमची नाही’असे उपरोधीकपणे बोलल्यामुळे समस्त ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावलेल्या असल्याचे म्हटले असून सद्यस्थीतीत ब्राम्हण समाजावर वारंवार राजकीय नेते मंडळी समाजाला गृहीत धुरून असे शाब्दीक हल्ले करून समस्त पुरोहीत वर्ग व ब्राम्हण समाजावर विनाकारण टिका टिपण्णी करत असतात त्या अनुषंगाने उद्ध्व ठाकरे यानी देखील त्यांचे पक्षाचा कार्यक्रमात समाजाबद्दल कथित अनुद्गार काढलेले आहे. त्याचप्रमाणे गायीला समस्त हिंदु समाजासाठी गो माता म्हणुन पुजनीय आहे असे असतांना उद्ध्व ठाकरे यांनी गाय ही आमची माता नाही , ती बैलांची आहे असे प्रकारचे वक्तव्य करून आपल्या अकलेचे तोर तोडले आहेत असे म्हटले असून पाचोरा व भडगांव तालुक्यातील समस्त ब्राम्हण समाज व पुरोहीत वर्ग यांच्या भावना दुखावल्यामुळे संबंधीतांवर योग्य ती कारवाई करण्यात येऊन आमच्या समाजाला यापुढेकोणत्याही राजकीय पक्षाने/ अध्यक्षाने ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास यापुढे समाज शांत बसणार नाही तर आम्हाला नाईलास्तव रस्त्यावर उतरून आंदोलन करणे क्रमप्राप्त होईल असा इशारा देखील देण्यात आला असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊन समाजाला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महासंघाचे तालुकाध्यक्ष मुकुंद बिल्दिकर यांनी या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली. यावेळी ब्राह्मण समाजाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.या निवेदनावर शिरीष जोशी,गिरीश कुलकर्णी, राम शर्मा, मिलिंद कुलकर्णी, सुधीर शर्मा, भावेश जोशी, सुजित तिवारी, ॲड.सचिन देशपांडे, ॲड.प्रशांत कुलकर्णी, संदीप सराफ,गुरुमुख शर्मा, विप्रदास प्रशांत गुरुजी, विशाल दीक्षित, प्रशांत जोशी,सचिन देशपांडे,गणेश पांडे,उदय जोशी, प्रदीप कौंडिण्य,गोविंदराव मोकाशी, राहुल तिवारी, सागर व्यास, प्रशांत कौंडिण्य, दीपक गौड, अरुण ओझा, महेंद्र कुमार मिश्रा, संदीप शहापूरकर, प्रशांत देव,नितीन कुलकर्णी, देविदास गव्हाळे, खुशाल पाटील, हर्षल जोशी, नितीन देशपांडे, गणेश कुलकर्णी, मनोज तिवारी, राजकुमार तिवारी, महेश कौंडिण्य, मिलिंद जोशी, संदीप काळकर,प्रसाद साखरे, गोविंद तिवारी, अमोल शर्मा, नितीन नाईक, गिरीश बर्वे, विजय शर्मा ,दीपक तिवारी, अभिषेक सारस्वत,आदित्य सारस्वत,सुदर्शन सारस्वत, चंद्रकांत जोशी यांचे सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खडकी बु. ता. चाळीसगाव येथे फिरते लोक अदालतीमध्ये ०७ प्रकरणांचा निपटारा रक्कम रुपये ११,२३,३१२/- ची वसुली