पाचोरा (वार्ताहर) दि,९
कोरोना काळात कमी झालेला व्यापार पूर्ववत सुरु करून बाजार समितीचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सरसावली असून त्याचाच एक भाग म्हणून नगरदेवळा येथे दर सोमवारी भरणारा गुरांचा बाजार पुन्हा सोमवार दिनांक १० जुलै पासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असुन नगरदेवळा परिसरातील सर्व गुरे-ढोरे खरेदी विक्री करणारे शेतकरी, व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील,सर्व संचालकमंडळासह सचिव बी बी बोरुडे यांनी केले आहे.नगरदेवळा उपबाजार समितीच्या परिसरातील गुरांच्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तेथे नवीन सोई सुविधा उपलब्ध केल्या असून वरखेडी बाजारा प्रमाणेच नगरदेवळा येथील गुरांचा बाजार देखील पुन्हा जोमाने सुरु होणार असल्याने परिसरातील शेतकरी व गुरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ एकमताने बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसह शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करत असून त्याचाच भाग म्हणून कोरोना काळात बंद पडलेला नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाचोऱ्यात रविवारी महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; सुनीताताई पाटील यांचा उपक्रम