पाचोरा(वार्ताहर) दि,१९
गोंडगांव ता भडगांव येथील बलिकेवरअमानुष कृत्य करुन निर्घुण खुन करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा पाटील समाज न्याय समितीच्या शिष्टमंडळाने आज तसे निवेदन प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन दिले असता मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंडगांव ता भडगांव येथील पिडीत बालिकेची केस जलदगती न्यायालयात चालविण्यास, व ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगुन गृहमंत्रींनी स्वतः फोन वर ऍड. उज्ज्वल निकम यांच्याशी बोलून त्यांच्यावर या केसचे कामकाज करण्याचे सांगितले, व ऍड उज्ज्वल निकम यांनी देखील क्षणाचाही विचार न करता केस चालवण्यासाठी होकार दिला असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी या शिष्टमंडळास सोबत घेऊन मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घालून सविस्तर माहिती दिली या दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थी मुळे आमच्या शिष्टमंडळास खुपच सहकार्य लाभले असल्याची भावना
सकल मराठा पाटील समाज बांधवानी व्यक्त केली आहे.यावेळी सोमनाथ मराठे पाटील सुरत, मुख्य संयोजक मराठा पाटील समाज न्याय समिती, चिंतामण पाटील, पाचोरा,भानुदास पाटील,दिलीप मराठे,मोतीलाल नरवाडे,भरत मराठे,विठ्ठल मराठे,भगवान तलवारे,अमृत मराठे,सुनील मराठे,गणेश चव्हाण,सुनील पाटील,मुकेश पाटील,विलास पाटील,गणेश पाटील,डॉ.ई.के.पाटील सुरत,अरुण पाटील, सुनील पाटील ,चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणवेश व वह्यांचे वाटपजळगावमधील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; 50 लाखांचा दंड