पाचोरा(वार्ताहर) दि,१०
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व तालुका विधी सेवा समिती, पाचोरा तथा वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आज ११ फेब्रुवारी रोजी पाचोरा न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखल पुर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी सदरच्या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असुन या लोक न्यायालयातील फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या कलम १३८ खालील दाखल प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, अपघात व्यायाधिकरणा बाबतची प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयका बाबतीची प्रकरणे (तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळुन), वैवाहिक वादा बाबतची प्रकरणे, अशा स्वरूपाची प्रलंबित प्रकरणाचा सामंजस्याने मिटविण्यात येणार असुन परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या राष्ट्रीय लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एम जी हिवराळे ,दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी केले आहे.
हे देखील वाचा…
‘तुझे काका वारले, माझ्यासोबत चल’ म्हणत अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीस पळविले
रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाला १७ लाखांचा गंडा