पाचोरा(वार्ताहर) दि,११
पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील व सुशील डेअरी शेजारील मानसिंगका नगर सह इतर पाच ते सहा कॉलन्यांना जोडणाऱ्या जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे येन पावसाळ्यात वाहनधारकांसह पादचारी,विविध शाळात जाणारे विद्यार्थी तसेच रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पाचोरा नगरपालिकेने तात्काळ हा रस्ता नवीन तयार करावा किंवा मूळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाश्यानी केली आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी साचल्यावर खड्डा लक्षात येत नाही.त्यामुळे वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत असतात अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना दिले आहे यावेळी जितेंद्र जैन ,फहीम शेख, कमलेश सुराणा,राजू वाघ, डॉ विकास भोसले,सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.दरम्यान नवीन रस्त्यांचा डीपीआर मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तात्काळ भडगाव रोड परिसरातील सर्वच कॉलनी भागातील रस्ते कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी दिली आहे.
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची २० लाखात फसवणूक;पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल