प्रा जयंत इंगळे यांना इंग्रजी विषयात क.ब.चौ.उ म वि जळगाव ची पी एच डी प्रदान
जळगाव येथील एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज चे प्राध्यापक डॉ.जयंत पंडित इंगळे यांना इंग्रजी विषयाची क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावची पी एच डी प्रदान करण्यात आली. ‘ए सायकोऍनालिटिकल स्टडी ऑफ द प्रोटॅगॉनिस्टस इन द नॉव्हेल्स ऑफ अनिता नायर’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सिगमंड फ्राइड यांच्या डिफेन्स मेकॅनिझम थेअरी, कार्ल युंगची कलेक्टिव्ह अनकॉन्शिएस थेअरी आणि सेल्फ थेअरी यांचा अनिता नायर यांच्या सहा कादंबऱ्यांमधील नायकांशी सहसंबंध जोडून संशोधन केलेले आहेत. या संशोधनामध्ये त्यांना मार्गदर्शक म्हणून एसीएस कॉलेज धरणगावचे इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख डॉ प्रवीण बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ जयंत इंगळे हे से.नि.प्रा.शि पंडितराव इंगळे आणि से.नि.प्रा.शि शैलजा इंगळे, मुक्ताईनगर यांचे सुपुत्र व कृषी सहायक अधिकारी योगेश इंगळे जळगाव यांचे ते बंधू आहेत. त्यांना क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या इंग्रजी विषयाच्या डॉ अभ्यासमंडळाचे चेअरमन डॉ भूपेंद्र कसूर, खडसे कॉलेजचे प्रा डॉ.ए पी पाटील व प्रा. डॉ जी एस चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या विशेष यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थालि.पाचोरा संस्थेची पंचवार्षिक निवडणूकबिनविरोध