रणजित परदेशी यांना मा.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
पाचोरा (वार्ताहर) दि,१३
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजित परदेशी यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून नुकताच धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार हा शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी दिला जातो.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शेख