पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शेख
पाचोरा (वार्ताहर) दि१३
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार पाचोरा तेथील रहिवासी असलेले नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नदीम शेख यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पद तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष पद भूषविले होते त्यामुळे पोलीस पाल्यांसाठी त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नदीम शेख यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.त्यांच्या निवडीबद्दल जळगाव , नाशिक ,मालेगाव, धुळे आदी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.