जळगाव प्रतिनिधी (संतोष सपकाळे)
सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून
अंतिम नवीन कोर्समध्ये जळगाव शहरातून माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे पदाधिकारी विधीतज्ञ ॲड.राजेंद्रप्रसाद माहेश्वरी यांचे चिरंजीव राम राजेंद्रप्रसाद माहेश्वरी ह्याने प्रथम प्रयत्नात कठीण मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (CA)अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे.
चि.राम राजेंद्रप्रसाद माहेश्वरी याने CA परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करत जळगाव जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
चि.राम याला संस्थेचे सर्व,पदाधिकारी ,
मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील यशस्वी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.