पाचोरा येथील प्रभू श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला आहे पाचोरा येथे असलेले प्राचीन कालीन प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा कायापालट होणार आहे. पाचोरा- भडगांव विधानसभेचे आमदार
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पाचोरा नगरीतील प्राचीन कालीन प्रभू श्रीराम मंदिर सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा करत १० कोटी निधी मंजूर करून आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत
परम तपस्वी विष्णुदास महात्यागी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीबीसी मातृभूमीचे संचालक प्रवीण ब्राह्मणे यांनी केले
यावेळी पाचोरा नगरपरिषदेचे मुख्यधिकारी शोभा बाविस्कर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल , शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पाचोरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.